‘या’ कारणामुळे सौरव गांगुली WTC फायनल पाहण्यासाठी इंग्लंडला जाणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – 18 जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या फायनलकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. भारत आणि न्यूझीलंडचे खेळाडू गेल्या महिनाभरापासून या टेस्टची तयारी करत आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली या फायनलसाठी प्रचंड उत्साही होते. तसेच त्यांनी हि फायनल पाहण्यासाठी इंग्लंडमध्ये जाऊन टीम इंडियाला पाठिंबा देण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र आता गांगुलीने फायनल बघायचा प्लॅन रद्द केला आहे.

फक्त सौरव गांगुलीच नाही तर बीसीसीआयचा कोणताही अधिकारी फायनल पाहण्यासाठी इंग्लंडला जाणार नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या कडक क्वारंटाईन नियमांमुळे हा प्लॅन रद्द केल्याचे बोलले जात आहे. या नियमांनुसार सौरव गांगुली, जय शहा किंवा कोणत्याही बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना क्वारंटाईनच्या नियमांमध्ये सूट दिली जाणार नाही आहे. सर्वसाधारपणे बोर्डाचे अधिकारी मॅच सुरु होण्याच्या काही दिवस आगोदर जातात. मात्र ईसीबीच्या नियमानुसार बीसीसीआयचे अधिकारी फायनल पाहण्यासाठी येणार असतील तर त्यांना 10 दिवस क्वारंटाईन राहवे लागणार आहे.

भारताची पुरुष आणि महिला टीम उद्या 3 जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. महिला टीम इंग्लंडमध्ये एक टेस्ट 3 वन-डे आणि 3 टी 20 मॅच खेळणार आहे. तर भारतीय पुरुष टीम या दौऱ्याची सुरुवात 18 जून रोजी होणाऱ्या फायनल मॅचने होणार आहे. या सामन्यानंतर दीड महिना भारतीय टीम इंग्लंडमध्येच राहणार आहे. यानंतर 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज सुरू होणार आहे.

Leave a Comment