फॅन्सनी धोनीबद्दल प्रश्न विचारल्यावर डेव्हिड मिलरने दिले ‘हे’ उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – दक्षिण आफ्रिकेचा मुख्य बॅट्समन असलेला डेव्हिड मिलर याचे भारतात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. त्याने आयपीएल स्पर्धेत आपल्या आक्रमक खेळीने भारतीयांच्या मनात जागा केली आहे. डेव्हिड मिलर काही वर्षांपूर्वी पंजाब किंग्ज या संघाकडून खेळत होता. आता तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. त्याचे सोशल मिडीयावर भारतीय फॅन फॉलोअर्स जास्त आहे.

आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर डेव्हिड मिलर दक्षिण आफ्रिकेला परत गेला आहे. सध्या तो घरी असून या वेळेचा उपयोग करण्यासाठी सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय झाला आहे. यामध्ये डेव्हिड मिलरने सोशल माीडियावर फॅन्सच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. या प्रश्न उत्तरांच्या कार्यक्रमात त्याला चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने ‘महेंद्रसिंह धोनी हा माझा आवडता क्रिकेटपटू आहे. बेस्ट फिनिशर. तो अतिशय शांतवृत्तीचा आणि नम्र स्वभावाचा आहे.’ असे उत्तर देत सगळ्यांची मने जिंकली आहेत. त्याचे उत्तर सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे.

मागच्या आयपीएलमध्ये डेव्हिड मिलरला फक्त एकच मॅच खेळण्याची संधी मिळाली. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याला नियमित संधी देण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये त्याने आक्रमक बॅटींग करून टीमला सामना जिंकवून दिला होता. उर्वरित आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सला डेव्हिड मिलरकडून खूप अपेक्षा आहेत.

Leave a Comment