Cricket Viral Video : बापरे!! PSL मधील सर्वोत्तम झेल; Video पाहून तुम्हीही व्हाल अचंबित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cricket Viral Video : क्रिकेट सामन्यात नेहमीच आपल्याला नवनवीन घटना घडताना पाहायला मिळतात. कधी कधी कोणीतरी लांब सिक्स मारतो, कोणी अफलातून कॅच घेतो तर कोणी शेवटच्या बॉल वर षटकार ठोकून संघाला अशक्यप्राय विजय मिळवून देतो. क्रिकेट मधील अनेक विडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. असाच एक विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तान सुपर लीगमधील हा विडिओ असून यामध्ये अशक्य असा झेल क्षेत्ररक्षकाने घेतलेला दिसत आहे. हा विडिओ कोणत्या सामन्यातील आहे आणि अशक्यप्राय असा अफलातून झेल घेणारा खेळाडू कोण आहे ते जाणून घेऊयात….

कसा घेतला अशक्यप्राय कॅच – Cricket Viral Video

पाकिस्तान सुपर लीग 2024 (PSL) मधील मुलतान सुलतान आणि पेशावर झाल्मी यांच्यातील सामन्यादरम्यान पेशावरचा खेळाडू मुसली याने अफलातून झेल घेत सर्वांचाच अचंबित केलं. मुलतानच्या फलंदाजीवेळी डेव्हिड विलीने आरिफ याकूबच्या एका चेंडूवर लाँग ऑनला षटकार मारण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू प्रेक्षकांमध्येच जाणारा असं वाटलं होते. परंत्तू लॉग ऑन वर उभा असलेल्या मुसलीने उडी मारून आधी चेंडू हवेत उडवला, नंतर त्याला समजलं कि आपला तोल जातोय, त्याच क्षणी त्याने पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या आत ढकलला आणि दुसऱ्या प्रयत्नात जबरदस्त कॅच घेतला. प्रेक्षकांनी या अफलातून झेलच चांगलंच कौतुक केलं. पाकिस्तान सुपर लीगच्या इतिहासातील हा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम झेल मानला जात आहे. सोशल मीडियावर या कॅचचा विडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, या सामन्यात पेशावरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पेशावरने 20 षटकांत 8 गडी गमावून 179 धावा केल्या. मात्र या धावसंख्येचा पाठलाग करताना मुलतान सुलतानची चांगलीच दमछाक झाली. डेव्हिड मलानच्या अर्धशतकानंतरही मुलतानचा ५ धावांनी निसटता पराभव झाला. अथक प्रयत्न करूनही मुलतानचा संघ 174 धावांपर्यंत मजल मारू शकला.