Monday, June 5, 2023

विराट कोहलीची फुटबॉल ‘किक’ सोशल मीडियावर ‘हिट'( Video)

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नुकताच इंग्लंड दौऱ्यासाठी तयार करण्यात आलेल्या बायो-बबलमध्ये दाखल झाला आहे. या क्वारंटाईन कालावधीमध्ये विराटने स्वत:ला फिट होण्यासाठी तयारी सुरु केली आहे.क्रिकेटच्या मैदानावर नवे रेकॉर्ड करणाऱ्या विराटने फुटबॉलने तयारीला सुरुवात केली आहे. याबाबत विराट कोहलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो फुटबॉलचा सराव करताना दिसत आहे. यावेळी तो एका किकच्या मदतीने गोल करण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने गोल करण्याचा चांगला प्रयत्न केला, पण त्याने मारलेला फटका सरळ गोलपोस्टच्या वरच्या कॉर्नरला लागला.

छेत्रीने मागितली फिस
विराट कोहलीने गोल करण्याचा केलेला प्रयत्न सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. यावेळी त्याने सर्वांना या प्रकारे गोल करण्याचे चॅलेंज दिले आहे. विराटच्या फुटबॉल किकचा वायरल झालेला व्हिडिओ भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री याने पहिला. तो व्हिडिओ पाहून त्याने विराटसमोर एक प्रस्ताव ठेवत एक ट्विट केले आहे. यामध्ये सुनील छेत्री म्हणाला कि, “सर्व कोचिंगच्या फिसचे बिल एकत्र पाठवू की हप्त्यामध्ये देशील चॅम्प?”

इंग्लंड दौऱ्यासाठी विराट कोहलीसह रोहित शर्मा,रविंद्र जडेजा,आणि अजिंक्य रहाणे हे खेळाडू मंगळवारी बायो-बबलमध्ये दाखल झाले आहेत. बायो-बबलमध्ये उशीरा प्रवेश केलेल्या खेळाडूंसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. या खेळाडूंना 7 दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण करावा लागणार आहे. तोपर्यंत ते टीम इंडियाच्या इतर खेळाडूंना भेटू शकणार नाहीत. विराट आणि रोहितसह अन्य खेळाडू टीम ज्यादिवशी इंग्लंडला रवाना होईल त्याचवेळी ते या टीमशी जोडले जातील अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.