४२ वर्षांपूर्वी आम्ही पाकिस्तानी भूमीवर भारतीय फिरकीपटूंच्या चिंधड्या उडविल्या होत्या-जावेद मियांदाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १९७८-७९ मध्ये बिशनसिंग बेदी,चंद्रशेखर भागवत आणि इरापल्ली प्रसन्ना यांच्या भारतीय फिरकी त्रिकुटाने क्रिकेट मैदानावर आपले वर्चस्व गाजवले होते.परंतु पाकिस्तानच्या जावेद मियांदादने सांगितले की या फिरकी त्रयीनविरुद्ध त्याने आणि झहीर अब्बासने धावांचा जोरदार पाऊस पाडला होता. ज्यामुळे पाकिस्तानला ही मालिका २-० ने जिंकता आली.

मियांदादने आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे की, “चंद्रशेखर, बेदी आणि प्रसन्ना यांची फिरकी भारतीय संघाची ताकद होती आणि त्यांनी जगभरात चांगली कामगिरी केली होती पण जेव्हा ते पाकिस्तानमध्ये आले तेव्हा आमच्या खेळाडूंनी त्याच्या जोरदार हल्ला करून भरपूर धावा लुटल्या. “

Javed Miandad- India TV

फैसलाबाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यास आठवत मियांदाद म्हणाला,”मला आठवते की चंद्रशेखर झहीर भाईला त्रास देत होते.त्यानंतर त्यांनी मला सांगितले की,माझ्यासाठी याला तू खेळून काढ. मी ठीक आहे बोललो. दुसऱ्या बाजूने झहीर भाई बेदी आणि प्रसन्ना यांच्या गोलंदाजीवर धावा काढत होते. “

तो म्हणाला, “मग मी त्यांना म्हणालो की झहीरभाई मलाही काही धावा करायला आवडेल.मीसुद्धा त्यांच्याविरूद्ध फूटवर्कचा वापर करणार आहे. मी येथे अडकलो आहे.शेवटच्या चेंडूवर मी एक धाव घेईन.”

त्या सामन्यात मियांदाद आणि अब्बास यांनी अनुक्रमे १५४ आणि १६६ धावा केल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment