टी -२० वर्ल्ड कप कोरोनाव्हायरसमुळे पुढे ढकलला जाणार ? आयसीसीने केला खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या कहराने संपूर्ण क्रीडा जगात शांत झाले आहे, त्यामुळे आता ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आयसीसी टी -२० वर्ल्ड कपचे आयोजनही धोक्यात आले आहे. क्रिकेटच्या कॉरिडॉरमध्ये अशी बातमी आहे की ज्या प्रकारे हा साथीचा रोग जगभर पसरत आहे,त्यामुळे असे दिसते आहे की ही स्पर्धादेखील पुढे ढकलण्यात येईल,परंतु आता आयसीसीने यावर निवेदन जरी करून सर्व अफवांना थांबा दिला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेम्हटले आहे की कोविड -१९ या साथीच्या रोगामुळे टी -२० वर्ल्डकपवर निर्णय घेण्याची कोणतीही घाई नाही आहे आणि आम्ही सर्वसमावेशक आपत्कालीन योजनेंतर्गत सर्व पर्यायांचा आढावा घेत आहे. टी -२० वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे
.
आयसीसीच्या प्रवक्त्याने स्कायस्पोर्टला सांगितले की, “आम्ही आयसीसी स्पर्धांसाठी आपली योजना चालू ठेवत आहोत पण वेगाने बदलणारी परिस्थिती पाहता आम्ही एक व्यापक आकस्मिक योजना देखील बनवित आहोत,”अचानक उद्भवणार्‍या परिस्थितीच्या आधारे सर्व उपलब्ध पर्यायांचा शोध घ्यावा लागेल.टी -२० वर्ल्ड कपला अजून सहा महिने बाकी आहेत आणि ऑस्ट्रेलियन सरकारसह सर्व संबंधितांशी सल्लामसलत केल्यानंतरच निर्णय घेण्याचा विचार आयसीसीने केला आहे.

प्रवक्त्यांनी सांगितले की, “आम्ही ऑस्ट्रेलियन सरकारसह आमच्या तज्ञ व अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन आणि योग्य वेळी निर्णय घेऊ.” माजी कर्णधार एलेन बोर्डेर आणि स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने यापूर्वी प्रेक्षकांशिवाय स्पर्धा घेण्याची शक्यता नाकारली आहे तर माजी फलंदाज सायमन कॅटिच आणि यष्टीरक्षक फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरी यांना वाटते की पुढे ढकलणेच योग्य आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment