लंडन : वृत्तसंस्था – येत्या 18 जून रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या फायनासाठी दोन्ही टीम जोरदार तयारी करत आहेत. यादरम्यान न्यूझीलंडचा ओपनिंग बॅट्समन डेवॉन कॉनवे हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताची डोकेदुखी ठरू शकतो. याच महिन्यात लॉर्डसवर टेस्ट पदार्पण करणारा कॉनवे सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात द्विशतक झळकावले होते. त्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्येदेखील त्याने 80 रनची खेळी केली होती. कॉनवेनं आत्तापर्यंत 101 च्या सरासरीने 303 रन काढले आहेत.
न्यूझीलंडची फायनलपूर्वी इंग्लंड विरुद्ध दोन टेस्ट खेळण्याची योजना यशस्वी झाली आहे. या मालिकेमध्ये न्यूझीलंडच्या सर्व बॉलर्सना सरावाची संधी मिळाली. तसेच कॉनवेने आपली योग्यता सिद्ध केली. त्यामुळे न्यूझीलंडची ओपनिंगची समस्या संपली आहे. कॉनवेने मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 14 टी20 मॅचमध्ये 59. 12 च्या ससरासरीने 473 रन काढले आहेत. टी20 क्रिकेटमध्ये जोरदार पदार्पण केल्यानंतर त्याला यावर्षी मार्च महिन्यात वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. या सामन्यात त्याने आपली योग्यता सिद्ध करत तीन वन-डे मध्ये 75 च्या सरासरीने 225 रन केले आहेत.यामध्ये एक
भारताकडे खास अस्त्र
कॉनवेने इंग्लंड विरुद्ध तीन टेस्टमध्ये 554 बॉलचा सामना केला आहे. या सामन्यात त्याने जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, मार्क वुड आणि ओली स्टोन या फास्ट बॉलर्सचा त्यांच्याच मैदानात सामना केला आहे. तर भारताकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा हे दिग्गज फास्ट बॉलर्स आहेत.या तिघांपेक्षाही कॉनवेला रोखण्यासाठी आर. अश्विन हा अनुभवी ऑफ स्पिनर अधिक उपयुक्त ठरणार आहे. अश्विनने आतापर्यंत 200 पेक्षा जास्त डावखुऱ्या बॅट्समन्सना आऊट केले आहे. त्यामुळे कॉनवेला आऊट करण्यासाठी विराटची मुख्य मदार हि अश्विनवर असणार आहे. आर. अश्विन सध्या टेस्ट रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा बॉलर आहे. त्यामुळे आता साऊथम्पटनमध्ये कॉनवे विरुद्ध अश्विन ही लढत बघायला मज्जा येणार आहे.