जोफ्रा आर्चरची विराट कोहलीबद्दल भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्विट वायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चरला क्रिकेटचा ज्योतिष समजले जाते. याचे कारण म्हणजे त्याने केलेले जुने ट्विट्स भविष्यातील घडामोडींवर लागू होतात. त्याच्या जुन्या ट्विट्सने अनेकवेळा खळबळ उडाली आहे. जोफ्रा आर्चरला ज्योतिषविद्या येते असेदेखील अनेक लोकांना वाटते. सध्या इंग्लंडमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरु आहे. सध्या जोफ्रा आर्चरचे विराट कोहली बद्दलचे जुने ट्विट व्हायरल होत आहे. 31 मार्च 2006 रोजी जोफ्रा आर्चरने हे ट्विट केले होते. त्याने आपल्या ट्विटमध्ये ‘आजचा दिवस तुझा असेल विराट’ असे म्हणले आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला होता. तर दुसऱ्या दिवशी विराट कोहली हा टीम इंडियाची ढाल बनला होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट 44 रनवर नाबाद होता. विराट तिसऱ्या दिवशी मोठा स्कोअर करेल अशी अपेक्षा होती. पण तो तिसऱ्या दिवशी लगेच आऊट झाला. काईल जेमीसनने विराटची विकेट घेतली. पण या अगोदर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जोफ्रा आर्चरचे विराट कोहली बद्दलचे ट्विट वायरल झाले आहे.

तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये भारतीय टीम 217 रनवर ऑल आऊट झाली. काईल जेमिसनने या इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या, तर बोल्ट आणि वॅगनरला प्रत्येकी 2-2 विकेट तर टीम साऊदीला एक विकेट घेण्यात यश आले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे थांबवण्यात आला आहे. दिवसाअखेरीस न्यूझीलंडचा स्कोअर 2 आऊट 101 एवढा झाला होता. न्यूझीलंडची टीम अजून 116 रनने पिछाडीवर आहे. तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रामध्ये भारताला दोन विकेट घेण्यात यश आले आहे. न्यूझीलंडचे ओपनर टॉम लेथम आणि डेवॉन कॉनवे यांनी टीमला 70 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली होती. या दोघांना आर. अश्विन आणि इशांत शर्मा याने आऊट केले आहे.

Leave a Comment