टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटपटूची पदार्पणातच कमाल, जगभरातून होत आहे प्रशंसा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडच्या साऊथम्पटन मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होत आहे. यामध्ये पहिला दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला होता. हि टेस्ट दुसऱ्या दिवशी सुरु झाली. या फायनल सामन्यामधून टीम इंडियाच्या एका खेळाडूने पदार्पण केले. त्याने पदार्पणातच सर्व क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने हे पदार्पण क्रिकेटच्या मैदानात नाही तर कॉमेंटेटर म्हणून केले आहे. टीम इंडियाचा क्रिकेटपटू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार दिनेश कार्तिकची कॉमेंटेटर म्हणून ही पहिलीच आंतरराष्ट्रीय टेस्ट मॅच आहे. फायनल मॅचच्या पॅनलमध्ये माजी कॅप्टन सुनील गावसकर यांच्यासह दिनेश कार्तिक यांचा समावेश आहे.

दिनेश कार्तिकने पदार्पणातच कॉमेंट्रीच्या पहिल्याच दिवशी इंंग्लंडचा माजी कॅप्टन नासिर हुसेन याला हजरजबाबी उत्तर दिले आहे. टीम इंडिया बॅटींगला उतरल्यानंतर नासिर हुसेनने रोहित शर्माच्या तंत्राची प्रशंसा केली. “रोहित शर्मा चांगला पुलर आहे. तो स्पिनर्सच्या विरुद्ध त्याच्या पायाचा चांगला उपयोग करतो. तसेच त्याची वृत्ती सकारात्मक आहे.” असे नासिर हुसेन म्हणाला. त्यावर दिनेश कार्तिकने अगदी तुझ्या उलट असे मजेशीर उत्तर दिले. दिनेश कार्तिकने दिलेल्या उत्तराने सर्व कॉमेंटेटरना हसू आवरले नाही.

https://twitter.com/dramaticdude_/status/1406191663345590274

या फायनलनंतर दिनेश कार्तिक इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आयोजित केलेल्या ‘द हंड्रेड’ लीगमध्येदेखील कॉमेंटेटर म्हणून काम करणार आहे. तसेच त्याने आगामी टी 20 वर्ल्ड कप खेळण्याची इच्छादेखील काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.

Leave a Comment