Wednesday, June 7, 2023

दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजनसिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. हरभजन सिंग तब्बल 23 वर्ष भारताकडून क्रिकेट खेळला. 2007 आणि 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा तो महत्त्वाचा भाग होता. हरभजनसिंग ने कसोटी क्रिकेट मध्ये हट्रिक घेण्याचाही भीमपराक्रम केला होता. भज्जी आणि टर्बानेटर या नावाने हरभजन सिंग ओळखला जातो

निवृत्ती बाबत घोषणा करताना हरभजन म्हणाला, प्रत्येक चांगल्या गोष्टी ला शेवट असतो. ज्या खेळाने मला सर्व काही दिले त्या क्रिकेट मधून मी निवृत्ती जाहीर करतो.मी त्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो ज्यांनी हा 23 वर्षांचा प्रवास सुंदर आणि संस्मरणीय बनवला. सर्वांचे मनःपूर्वक आभार

हरभजन सिंगनं १०३ कसोटीत ४१७ विकेट्स, २३६ वन डे सामन्यांत २६९ व २८ ट्वेंटी-२०त २५ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत त्याच्या नावावर २ शतकं व ९ अर्धशतकांसह २२२४ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्यानं १६३ सामन्यांत १५० विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएल मधेही हरभजन यशस्वी ठरला. आयपीएल मध्ये त्याने मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग आणि कोलकाता नाईट रायडर्स या यशस्वी संघाचे प्रतिनिधित्त्व केलं. हरभजन सिंगने आयपीएल मध्ये आत्तापर्यंत १६३ सामन्यात १५० बळी मिळवले