मुंबई इंडियन्स नेहमीच माझ्या हृदयात राहील; हार्दिक पंड्या झाला भावुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ हंगामासाठी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड आणि सुर्यकुमार यादव असे 4 खेळाडू कायम ठेवले असून गेल्या काही वर्षांपासून संघासोबत असलेल्या पंड्या बंधूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर हार्दिक पंड्या ने इंस्टाग्रामवर एक भावुक व्हिडिओ शेअर करत मुंबई इंडियन्स बद्दलचे आपलं प्रेम व्यक्त केल आहे.

2015, 2017, 2019, 2020 मध्ये मुंबईने आयपीएलचे विजेतेपद पटकावले. तेव्हा हार्दिक या संघाचा महत्त्वाचा भाग होता. त्याने एक भावनिक व्हिडिओ शेअर करत म्हटले की, “मी या आठवणी आयुष्यभर माझ्यासोबत ठेवीन. हे क्षण मी कायम माझ्याजवळ ठेवीन. मी इथं जी मैत्री केली आहे, जी नाती बांधली. त्यांचा मी सदैव ऋणी राहीन असे हार्दिक पंड्या ने म्हंटल आहे.

मी केवळ एक खेळाडू म्हणून नाही तर माणूस म्हणूनही सुधारलो आहे. मी युवा क्रिकेटपटू म्हणून येथे मोठ्या स्वप्नांसह आलो. आम्ही एकत्र जिंकलो, आम्ही एकत्र हरलो, आम्ही एकत्र लढलो. या संघासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्या हृदयात आहे. प्रत्येकजण म्हणतो की चांगल्या गोष्टींचा अंत व्हायला हवा, पण मुंबई इंडियन्स नेहमीच माझ्या हृदयात राहील.”

You might also like