‘हिटमॅन’ रोहित शर्माला राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । हिटमॅन रोहित शर्मासह पाच खेळाडूंना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्मा याच्या व्यतिरिक्त महिला कुस्तीपटू विनेश फोगट महिला टेबलटेनिसपटू मनिका बत्रा आणि पॅरालिम्पिकपटू मारियाप्पन थंगावेलू आणि हॉकीपटू राणी यांनाही राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार मिळाला आहे. मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत या रोहित, विनेश फोगाटसह अन्य दोन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. सचिनला 1998 साली, धोनीला 2007 तर विराटला 2018 साली हा पुरस्कार मिळाला होता.

2019 वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माने 5 शतकं झळकावत स्वतःला सिद्ध केलं होतं. त्यामुळे बीसीसीआयने त्याचं नाव खेलरत्न पुरस्कारासाठी दिलं होतं. एकदिवसीय प्रकारात रोहित शर्माचा रेकोर्ड चांगला आहे. 50 ओवरच्या फॉर्मेटमध्ये 2019 सालात सर्वाधिक रन काढण्यात रोहितचा नंबर पहिला आहे. रोहितने सात शतकांसह 1,490 रन आपल्या खात्यात जमा केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”