हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे क्रिकेट जगतात देखील मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी सामने रद्द करण्यात आले आहेत तर काही देशात प्रेक्षकांशिवाय सामने सुरू आहेत. परंतु प्रेक्षकांविना सामने खेळणे म्हणजे खेळाडूंना पण वेगळं वाटत आहे. त्यातच भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्माने ट्विटर वर एक फोटो शेअर करत आपल्या मनातील भावना मोकळ्या केल्या.
या फोटो मध्ये रोहित शतक ठोकल्यानंतर हेल्मेट आणि बॅट उंचावून प्रेक्षकांना अभिवादन करताना दिसून येत आहे. या फोटोमध्ये त्याने सगळा फोकस हा प्रेक्षकांवरती ठेवला आहे. फ्रेंड्स या रियूनियनचा मी वाट पाहतो आहे’. म्हणजेच प्रेक्षकांनी भरलेलं स्टेडिअम, गर्दी, आवाज, आपल्या खेळाडूंसाठीचं केलेलं चिअरअप….या सगळ्या गोष्टी रोहित मिस करतोय, त्याचीच आठवण रोहितने शेअर केलेल्या फोटोमधून करून दिली आहे.
𝗙.𝗥.𝗜.𝗘.𝗡.𝗗.𝗦, this is the reunion I am waiting for! pic.twitter.com/nGBhDA6yM4
— Rohit Sharma (@ImRo45) May 27, 2021
दरम्यान कोरोनामुळे यंदाची आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली असून ही आयपीएल दुसऱ्या देशात खेळवण्यावर बीसीसीआयकडून विचार चालु आहे. रोहित शर्मा आयपीएल मध्ये मुंबई इंडिअन्स च नेतृत्व करत असून त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने तब्बल 5 वेळा आयपीएल वर आपलं नाव कोरल आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.