मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असून आता तर क्रिकेटचा देव आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर याना देखील कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः सचिनने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून सौम्य लक्षणे आहेत . माझ्या घरातील इतर सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. मी घरातचं क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व खबरदारी मी घेत आहे, असं सचिनने म्हटलं आहे.

दरम्यान राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून ही चिंतेची बाब आहे. अनेक निर्बंध लादून देखील कोरोना आटोक्यात येत नसल्याने राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like