टीम हॅलो महाराष्ट्र । भारतीय महिला संघाची आघाडीची क्रिकेटपटू स्मृती मंधाना हीची एक धडाकेबाज भारतीय महिला फलंदाज म्हणून जगभर ओळख आहे. मात्र, तिने मैदानावरील घेतलेल्या एका कॅचमुळे ती पुरुष खेळाडूंपेक्षा उत्तम क्षेत्ररक्षक असल्याचं आता म्हटलं जात आहे. स्मृतीने टी-२० चॅलेंजर ट्रॉफीत महिलांच्या टी-२० चॅलेंजर ट्रॉफीत भारत ब संघाकडून खेळताना स्मृतीने हवेत उडी मारत एकहाती कॅच पकडली आहे.
भारत अ संघ फलंदाजी करताना, अनुजा पाटील सहावं षटक टाकत होती. देविका वैद्यने अनुजाच्या गोलंदाजीवर कव्हरचा फटका खेळला, मात्र स्मृतीने सीमारेषेच्या दिशेने जाणारा चेंडू हवेत उडी मारत एक हाती कॅच झेलत देविका वैद्यला पॅव्हेलियनचारास्ता दाखवल. तिच्या या कामगिरीची सर्वत्र चर्चा सध्या होत आहे. सोशल मीडियावर स्मृती मंधानाच्या या भन्नाट कॅचचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. स्मृतीने आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर भारत ब संघाने टी-२० चॅलेंजर ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
स्मृती मंधानाने घेतलेला हाच भन्नाट कॅच
पहा व्हिडीओ-