वाळू उपसा प्रकरणी मनसे जिल्हाध्यक्षासह 16 जणांवर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वाकी येथे महसूल विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून या कारवाईत माणगंगा नदीतून वाळू उपसा करीत असलेल्या सोळा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कट्टे- पाटील (रा. गोंदवले बु.) हणमंत सावंत (रा.दिवड) याच्यासह अनोळखी 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाळू चोरीबाबतची घटना दि. 22 रोजी वाकी गावच्या हद्दीतील माणगंगा नदीपात्रात घडली होती. तक्रारदार मंडलाधिकारी सुनील खेडेकर यांना माणगंगा नदी पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी महसूल विभागाने पथक तयार करुन दि. 22 रोजी वाकी येथे धाड टाकली. महसूल कर्मचार्‍यांना पाहिल्यानंतर वाळू उपसा करणार्‍या ट्रॅक्टर चालकासह इतरांनी वाळू तेथेच ओतून ट्रॅक्टर घेवून तेथून पळ काढला. महसूल विभागाने घटनास्थळाचा पंचनामा करुन कारवाईला सुरुवात केली.

[better-ads type=’banner’ banner=’197269′ ]

या घटनेची माहिती संबंधित संशयित आरोपींना समजल्यानंतर त्यांनी कारवाई करण्यास मज्जाव केला. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. चर्चा करुनही महसूलचे कर्मचारी ऐकत नसल्याने वादावादी झाली. मात्र, मंडलाधिकारी सुनील खेडेकर यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Comment