फलटण | विडणी (ता. फलटण) येथील विवाहितेचा माहेरहून 5 लाख रूपये घेऊन ये असे म्हणून जाचहाट केल्याप्रकरणी चाैघांवर फलटण ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी विवाहीतेच्या पतीसह सासू, सासरे व दिर यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. पैशांची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ करुन जाच हाट केल्याचे म्हटले आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, सारीका सुशांत सोनवलकर (वय- 22, रा. लिमटेक, मांगोबामाळ विडणी सध्या, रा. 31 फाटा मठाचीवाडी ता. फलटण) यांना पती सुशांत हनुमंत सोनवलकर, सासरे हनुमंत निवृत्ती सोनवलकर, सासू विमल हनुमंत सोनवलकर व दिर प्रशांत हनुमंत सोनवलकर (सर्व रा. विडणी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.
सासरी विडणी येथे 8 डिसेंबर 2019 ते 19 आक्टोंबर 2021 या कालावधीत वेळोवेळी तिथे असताना वारंवार उपाशीपोटी ठेवून, नवऱ्याला कायमस्वरूपी नोकरीस लावण्यासाठी तू माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून त्यांचा शारीरिक,मानसिक छळ करून जाचहाट केला. या प्रकरणी सारीका सोनवलकर यांनी फिर्याद दाखल केली असून, पुढील तपास पोलिस हवालदार शिंदे करीत आहेत.




