साताऱ्यात काॅलेजमधील मुलीवरून राडा, चाैघांवर गुन्हा

सातारा | महाविद्यालयात मुलीवरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन वर्ये येथील यश लोखंडे या युवकास चार जणांनी मारहाण केली. संशयितांनी यशच्या डोक्यात वीट घालत दगडानेही मारहाण केली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात प्रथमेश जगताप याच्यासह चार जणांवर गुन्हा झाला आहे.

सातारा याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यश संतोष लोखंडे (वय- 19, रा. वर्ये, ता. सातारा) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, यश याचा भाऊ श्रेयश ज्या कॉलेजमध्ये शिकत आहे. त्या कॉलेजमध्ये मुलीवरुन भांडणे झाली आहेत.

शनिवार दि. 23 रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास यश साताऱ्यातील भूविकास बँकेजळील चौकात उभा होता. याचवेळी प्रथमेश जगताप (रा. वर्ये, ता. सातारा) हा तेथे आला आणि त्यांनी खाली पडलेली वीट उचलून यश याच्या डोक्यात मारुन त्याला जखमी केले. यावेळी त्याला दमदाटी करत धमकावले.

प्रथमेशने मारहाण करत यशला धमकावले व म्हणाला ‘तुझा भाऊ श्रेयस याची ज्या मुलीमुळे भांडणे झाली तिथल्याच मुलांनी मला तुला मारायला पाठवले आहे. परत जर तू आमच्या नादाला लागलास तर तुला मी जीवंत सोडणार नाही,’ असे म्हणाला.

You might also like