बसस्टँड जवळ चोरीची दुचाकी घेऊन फिरणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | चोरी केलेल्या वाहनावर वाहन क्रमांक बदललून फिरत असलेल्या दुचाकीस्वारास पोलिसांनी पकडले. बसस्टॅण्ड परिसरात चोरीच्या वाहनावर एक जण फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.

यानंतर 9 जुलै रोजी सकाळी मध्यवर्ती बसस्थानका समोर गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित दुचाकीस्वाराला अडविले. पोलिसांनी नाव आणि दुचाकी कोणाच्या नावे आहे हे विचारले असता दुचाकीस्वाराने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी दुचाकीच्या चेसीस क्रमांकाच्या आधारे आरटीओच्या नोंदणी क्रमांकाची माहिती घेतली असता मोटर सायकल पैठण येथून चोरी झाल्याचे समोर आले.

फय्याज असे या आरोपीचे नाव असून त्याने चोरीची दुचाकी पकडली जाऊ नये म्हणून दुचाकीचा मूळ नोंदणी क्रमांक (एमएच-20 बीडी 6830) बदलून नंबर प्लेटवर त्याने एमएच 20 बीएफ 9482 असा बनावट क्रमांक टाकल्याचे समोर आले. याविषयी पोलीस हवालदार गजानन मांटे यांनी त्याच्याविरोधात तक्रार नोंदविली असून ही दुचाकी त्याने चोरली आहे की त्याने चोरट्याकडून विकत घेतली, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष राऊत आणि गुन्हे शोधपथक करत आहेत.

Leave a Comment