चुरू : वृत्तसंस्था – चुरू या ठिकाणी एका तरुणानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या तरुणाला मोबाईलवर गेम खेळायची खूप आवड होती. त्याची हि ऑनलाइन गेम खेळण्याची सवय हळूहळू व्यसनामध्ये बदलली. यामुळे तो खूप अस्वस्थ झाला होता. मानसिक तणावामुळं त्यानं शुक्रवारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
27 वर्षीय गिरीश हा ड्रायव्हिंग स्कूल चालवायचा, त्याला मोबाईलवर गेम खेळण्याची खूप आवड होती. गोळ्यांचा आवाज ऐकल्यावर गिरीशच्या घरात भीतीचे वातावरण निर्माण होत होते. कुटुंबीय त्याच्या खोलीत पोहोचताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मुलाचे हे कृत्य पाहून संपूर्ण कुटुंब हादरले. यानंतर कुटुंबीयांनी याची माहिती पोलिसांना दिली.
हि घटना राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात घडली आहे. देशी बनावटीच्या पिस्तुलातून निघालेली गोळी मृताच्या डोक्याच्या मध्यभागी लागली आहे. मृत तरुणाला मोबाईलवर सतत गेम खेळण्याचे व्यसन जडले होते. यामुळे तो मानसिक तणावाखाली जगत होता. यानंतर कोतवाली पोलिसांनी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.