शिवसेनेच्या शेखर गोरेंसह सहाजणांवर अपहरणाचा गुन्हा

म्हसवड ः सातारा जिल्ह्यात बँक निवडणुकीसाठीच्या ठरवानंतर डॉ. नानासाहेब शिंदे यांच्या अपहरणाचा तपास करत असतानाच पोलिसांसमोर आणखी दोघांच्या अपहरणाची घटना उघडकीस आली आहे. पानवन (ता. माण) येथील दोघांच्या अपहरणप्रकरणी शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा म्हसवड पोलिसांत नोंद झाला आहे. अपहरण का व कशासाठी करण्यात आले याचा तपास पोलीस करत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पानवन (ता. माण) येथील धनाजी आबाजी शिंदे व त्यांचे मित्र छुब चव्हाण यांना गुरुवार (दि. 25) पासून रविवार (दि. 28) पर्यंत गायब होतो. आम्हां दोघा मित्रांना शेखर भगवान गोरे, राजेंद्र उर्फ राजू ब्रम्हदेव जाधव, संग्राम अनिल शेटे, दत्ता घाडगे, राहुल अर्जुन गोरे, वीरकुमार पोपटलाल गांधी व गाडीवरील चालक हरिदास गायकवाड यांनी त्यांच्या ईनोवा गाडी (क्र. एमएच 11 – 7057) मधून जबरदसतीने बसवून कुळकजाई येथील फार्म हाऊस तसेच ठाणे येथील लॉजवर थांबवून ठेवले होते.

याबाबत धनाजी आबाजी शिंदे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह वरील सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास म्हसवड पोलीस करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like