CRIME NEWS : इन्स्टाग्रामवर मैत्री अन् नंतर बलात्कार करुन केलं प्रेग्नंट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | इन्स्टाग्राम अ‍ॅपद्वारे मैत्री संबंध वाढवून विवाहाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी जयदीप जयपाल चौधरी यास अटक केली. पीडित अल्पवयीन मुलीची जानेवारी 2021 मध्ये मोबाईल इन्स्टाग्राम अ‍ॅपवर जयदीप चौधरी याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले.

दोघेही चॅटिंग करत होते. जयदीपने भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मार्च 2021 मध्ये पीडित मुलगी इस्लामपूर येथे नातेवाईकांकडे एका कार्यक्रमानिमित्त आली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यातही राहण्यासाठी आली होती. जयदीपने मुलीला इस्लामपूर स्टॅण्डवर भेटण्यासाठी बोलावले. जयदीप मुलीला घेऊन दुचाकीवरून बहे बेटावर गेला. पीडित मुलीला निर्जनस्थळी नेऊन जयदीप शरीरसुखाची मागणी करत बळजबरी करू लागला.

मुलीने नकार देताच जयदीपने लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केला. त्यानंतर 15 दिवसांनी पीडित मुलगी गावी निघाली होती. इस्लामपूर स्टॅण्डवरून तिला गावाला सोडण्याचा बहाणा करून वाठार येथील साई लॉजवर नेऊन लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. 7 नोव्हेंबर रोजी पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने मुलीच्या आईने दवाखान्यात नेले.

जयदीपने वारंवार बळजबरी केल्याने पीडित मुलगी 6 महिन्यांची गर्भवती झाली. त्यानंतर गर्भपात झाला. पीडित मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. याबाबतची फिर्याद पीडित मुलीने दिली आहे.

Leave a Comment