हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सीएए कायद्याविरोधात काढलेल्या मोर्चावर काल एका तरुणाने गोळीबार केला होता. या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला होता. विशेष म्हणजे पोलिसांच्या मोठ्या फौजफाटाच्या उपस्थितीत हा संपूर्ण प्रकार घडला होता. दरम्यान, पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
या तरुणाच्या भ्याड हल्ल्यानंतर खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निंदा करत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती ट्विटरवरून दिली होती. तर समाजतील विविध स्तरातून या घटनेची निंदा केली जात असतांना गोळीबार करणाऱ्या तरुणाचा हिंदू महासभेकडून सत्कार केला जाणार आहे. याबाबतची माहिती हिंदू महासभेकडून देण्यात आली आहे.
”हा तरुण नथुराम गोडसेप्रमाणे खरा राष्ट्राभक्त आहे,” असं हिंदू महासभेने म्हटलं आहे. ”शरजील इमाम आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, शाहीन बागमधील देशद्रोही लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत,” असं धक्कादायक वक्तव्य हिंदू महासभेच्या प्रवक्त्यांनी केलं आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स नाऊ या वेबसाईटने दिलं आहे.
”या मुलाचा आम्हाला अभिमान आहे. त्याने जामियाच्या कॅम्पसमधील देशद्रोही कृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित असणारी आझादी देण्याचा प्रयत्न त्यानं केला,”असं मत हिंदू महासभेचे प्रवक्ते अशोक पांडे यांनी व्यक्त केलं आहे. देशद्रोही विचारसरणीच्या व्यक्तींना धडा शिकवण्याचा प्रयत्न या तरुणाने केला आहे असंही पांडे म्हणाले. इतकंच नाही तर ”खून आणि देशाच्या भल्यासाठी केलेल्या कृत्यामध्ये फरक असतो. देशहितासाठी केलेल्या कृत्याला कायदा वेगळा असतो,” मतही पांडे यांनी मांडले. जामियामध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचा सत्कार करण्याबरोबरच त्याला या प्रकरणात लागणाला सर्व कायदेशीर खर्च हिंदू महासभा करणार असल्याचेही पांडे यांनी स्पष्ट केलं आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
..म्हणून विप्रोच्या ‘सीईओं’नी दिला आपल्या पदाचा राजीनामा
कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेत WHO कडून जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित
श्रीनगर महामार्गावरील चकमकीत ३ दहशतवादी ठार; चकमक अजूनही सुरु