गुरुग्राम : वृत्तसंस्था – दिल्लीजवळील गुरुग्राममध्ये एक अजब प्रकरण समोर आले आहे. डेटिंग अॅपच्या माध्यमातून अल्पवयीन तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आणि नंतर ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा खेळ सुरू करणाऱ्या ‘वसुली गर्ल’ला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हि तरुणी पोलिसांत खोट्या तक्रारी दाखल करण्याची भीती दाखवून पीडित तरुणांकडून लाखों रुपये उकळत होती. न्यू कॉलनी पोलिसांनी या 20 वर्षीय तरुणीला अटक करून ब्लॅकमेलिंग आणि वसुलीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या रॅकेटमध्ये आरोपी तरुणीसोबत तिची आई आणि तिचा साथीदारही सामील होता. पोलिसांनी या तरुणीसह अजून दोघांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या तिघांशिवाय इतर कोण-कोण सहभागी होते याची सध्या चौकशी सुरु आहे.
गुरुग्रामचे एसीपी क्राइम प्रीतपाल सिंह यांनी ही माहिती दिली. 20 ऑगस्ट रोजी पीडित मुलाचे आरोपी मुलीशी डेटिंग अॅपच्या माध्यमातून ओळख झाली होती. यानंतर या तरुणीने पीडित मुलाला आपल्या जाळ्यात गोवलं. एवढंच नव्हे तरुणीने तर दोनच दिवसात त्याच्याशी शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 ऑगस्टपर्यंत तरुणीने तरुणाला लग्न करण्यास भाग पाडले असे पीडित मुलाने सांगितले. हि तरुणी एवढ्यावरच थांबली नाही तर तिने सोशल मीडिया किंवा डेटिंग अॅपच्या माध्यमातून पद्धतशीरपणे इतर काही तरुणांना अडकवून तरुणीने त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून देखील पैसे उकळले होते.
आरोपी तरुणीने राजेंद्र पार्क, न्यू कॉलनी, सेक्टर 10, सिव्हिल लाइन्स, डीएलएफ फेज-1 आणि सायबर क्राइम पोलिसात वर्षभरात एकूण 7 तरुणांविरुद्ध बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पोलीस तपासात दोन प्रकरणे खोटे असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी या तरुणीचा शोध घेऊन तिला अटक केली. या तरुणीने 15 महिन्यांत तब्बल 8 जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे.