महाराष्ट्र राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यात शासकीय आकडेवारीनुसार गेल्या वर्षीपेक्षा चालू वर्षात गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यात पोलिसांना यश आले असल्याची माहीती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी पोलिसांच्या कामांची माहीती आकडेवारीनिहाय त्यांनी पत्रकारांना दिली.

राज्यात हुंडाबळीचे गुन्हे २, आत्महत्येस प्रवृत्त करणे १०७, ॲसिड हल्ले २, महिलांचा छळ होण्याचे गुन्हे २ हजार ४३ ने कमी झाले. अपहरणांच गुन्हे १ हजार ६२८ ने कमी, अनैतिक मानवी व्यापारीचे गुन्हे १०४ ने कमी, वेश्या व्यवसाय गुन्हे ३६, तर बलात्कार ५५९ ने कमी, विनयभंग ९५९, छेडछाडीचे २४३, अनैतिक व्यापार प्रतिबंधक गुन्हे ७३ इतर विशेष स्थानिक कायद्याचे गुन्हे १३१ ने कमी झालेले असल्याची माहिती गृहराज्यमंत्र्यांनी दिली.

शंभूराज देसाई म्हणाले, महिला, मुले याच्यासह लोकांच्या सेवेसाठी महाराष्ट्र पोलिस सदैव कार्यरत आहेत. जनतेचा पोलिसांवर विश्वास आहे. तसेच लोकांच्यात जनजागृती व योग्य सेवा पोलिस देत असल्याने गुन्ह्याचे प्रमाण मागील वर्षापेक्षा चालू वर्षी कमी आहे. राज्याचे हिताच्या दृष्टीने योग्य काम महाराष्ट्र पोलिस करत असून कधी- कधी लोकांच्या सुरक्षितेसाठी कारवाई करावी लागते.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment