बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 जणांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

ह.भ.प बंडातात्या कराडकर यांच्यासह 100 ते 125 जणांवर साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाच्या वाईन विक्री विरोधात व्यसनमुक्त युवक संघाने साताऱ्यात आंदोलन केल्या प्रकरणी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून आंदोलन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोणतीही परवानगी नसताना आंदोलन केल्याने विलास शंकर जवळ (रा.जवळवाडी ता मेढा जि. सातारा), मनोज सतिष निंबाळकर, सुरेश दिनानाथ कदम, अरविंद रामचंद्र जवळ, आकाश विलास जवळ (रा. जवळवाडी ता. जावळी जि.सातारा), उत्तम जानु सावंत (रा. चंदननगर- एमआयडीसी सातारा), विलास जवळ (रा. जवळवाडी ता. मेढा जि.सातारा), प्रकाश सदाशिव जत्रे उर्फ बंडातात्या कराडकर (रा.करवडी ता कराड जि. सातारा), संदीप विठठल जगताप (रा. एमआयडीसी, सातारा), बाळासाहेब भिमराव निकम (रा. शेरे, ता कराड, जि. सातारा), योगेश जाधव (सचिव व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र), घनशाम आबासाहेब नांदगांवकर (रा. नांदगांव ता.कराड जि. सातारा), दिपक वासुदेव जाधव (रा. मळोली ता. माळशिरस जि.सोलापुर), सचिन शिंदे (व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र), योगेश जाधव मार्गदर्शक व इतर 100 ते 125 जण यांनी विनापरवाना परवानगी नाकारली असतानाही. जमाव जमवुन पोवईनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी चालत जावुन मोर्चा काढला. सदवरेळी उपस्थित पोलीस अधिकारी यांनी त्यांना सुचना देवुनही सुचनांचे पालन केले नाही.

तसेच जिल्हादंडाधिकारी सातारा यांचेकडील आदेश क डीसी / एमएजी/ २ / एसआर/०७/२०२२ सातारा दिनांक १.२.२०२२ अन्वये कोवीड १९ अनुषंगाने सीआरपीसी १४४ प्रमाणे जिल्हादंडाधिकारी व सातारा यांचेकडील आदेश क. डीसी / एमएजी/ २ / एसआर / ०६ / २०२२ सातारा दिनांक २४१.२०२२ अन्वये संपूर्ण सातारा जिल्हयात दिनांक २५.१.२०२२रोजीचे ००.०० ते ३.२.२०२२ रोजीचे २४.०० वा. पर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागु केलेला आदेशचा भंग केला आहे. तसेच त्यांना दिलेल्या नोटीसीचा भंग केला आहे म्हणुन त्यांचेवर भादविस कलम १८८.२६९,२७०, महाराष्ट्र पोलीस अधिनीयम १९५१ कलम ३७(१) (३)/१३५ आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब साथरोग अधिनियम १८८७ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment