राज्यभर गाजलेल्या ‘त्या’ पोस्टर मॅन वर अखेर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – तीन अपत्य असल्यामुळे आपण महापालिका निवडणूक लढवू शकत नाही. निवडणूक लढविण्यासाठी दुसरी पत्नी हवी, या आशयाचे पोस्टर्स रविवारी शहरात झळकले. त्यामुळे शहरासह राज्यात एकच खळबळ उडाली. संतप्त भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या पोस्टर्सला काळे फासून फाडले. प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात येताच महापालिकेने अनधिकृत पोस्टर लावणाराविरुद्ध महाराष्ट्र मालमत्तेच्या विकृतीकरण प्रतिबंध अधिनियम 1995 च्या कलम 3 प्रमाणे क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.

रमेश विनायकराव पाटील याने रविवारी सकाळी गुलमंडी, औरंगपुरा, पैठणगेट या भागात एकसारख्या मजकुराचे पोस्टर लावले. त्यावर ‘औरंगाबाद महापालिका निवडणूक 2022’ असे ठळक अक्षरात लिहून त्या खाली ‘मला तीन अपत्य असल्याने निवडणूक लढवू शकत नाही. निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे. (जातीची अट नाही) वय 25 ते 40 असावे. अविवाहित, विधवा, घटस्फाेटीत चालेल. फक्त दोन अपत्य (मुले) पेक्षा जास्त असणारी चालणार नाही’, असा मजकूर होता.

सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल झाले. महिलांनी त्यासंदर्भात तीव्र संताप व्यक्त केला. दुपारी भाजप महिला आघाडीच्या मनीषा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पैठणगेट गाठले. भाजप कार्यकर्ता अजय चावरिया यांनी पोस्टरला काळे फासले.

Leave a Comment