धक्कादायक ! तडीपार गुंडाने केला सहाय्यक फौजदाराचा खून

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आज पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्षभरापूर्वी तडीपार करण्यात आलेल्या एका गुंडाने फरासखाना पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदाराचा खून केला आहे. हि घटना आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ घडली आहे. या प्रकरणी गुंड प्रवीण महाजन याला अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण
एक वर्षापूर्वी आरोपी प्रवीण महाजन याला तडीपार करण्यात आले होते. तरीदेखील तो शहराच्या मध्यवस्तीमध्ये आला होता. सहाय्यक फौजदार समीर सय्यद हे आपली ड्युटी संपवून खडक पोलीस लाइनमधील राहत्या घरी जात असताना त्यांच्यावर श्रीकृष्ण टॉकीज जवळ हल्ला करण्यात आला. त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. हा खून कशामुळे करण्यात आला हे अजून स्पष्ट झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत प्रवीण महाजन याला अटक केली आहे. प्रवीण महाजन हा एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर 20 पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. यामुळे त्याला 2 वेळा तडीपार करण्यात आले होते.

बुधवार पेठेत महिलेचा खून
या घटनेची चौकशी करत असताना थोड्याच अंतरावर बुधवार पेठेत एका महिलेचा खून झाला आहे. खून झालेल्या महिलेचे नाव राणी असे आहे. तिच्याबद्दल अजून कोणती माहिती मिळालेली नाही. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काही तासांच्या फरकाने या घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

You might also like