दगडी चाळीतून अरुण गवळीला या अधिकाऱ्याने कॉलर पकडून बाहेर काढलं होतं.

3
70
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

मुंबई प्रतिनिधी | मुंबई म्हणजे गुन्हेगारी जगतातील एक महत्वाचा शहर. या शहरात अनेक गुन्हेगार तयार झाले आणि संपलेही. मुंबईत 90 च्या दशकात अनेक टोळ्या सक्रिय होत्या त्यापैकी एक महत्वाची गेंग म्हणजे अरुण गवळी ची गेंग. या गेंग चा प्रमुख होता अरुण गवळी.अरुण गवळीचा जन्म १७ जुलै १९५५ रोजी मुंबईत झाला. मराठी माणूस, पांढरा पोशाख, डोक्यावर गांधी टोपी असा त्याचा पेहराव. मात्र गुणधर्म मात्र भिन्न.
मुंबईत १९९३ च्या बॉंबस्फोट नंतर दाऊद ने परदेशात पलायन केलं. दाऊद परदेशी गेल्यावर गवळीची ताकद मुंबईत आपोआपच वाढली.त्याचाच फायदा त्याने घेत गवळीने पोलिसांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली.पोलिसांना मारहाणी च्या घटना काही थांबत नव्हत्या.मुंबई पोलिसांना जेरीस आणणाऱ्या गवळीने एकदा एका महिला पत्रकाराला मारहाण केल्याची माहिती मुंबई पोलीसातील एका अधिकाऱ्याला कळाली.

त्यांनी लागलीच दगडी चाळ गाठून गवळीला कॉलर पकडून मारहाण करत जीप मध्ये बसवून चौकीत आणल होतंं. त्यांनंतर गवळी ने त्यांचा चांगलाच धसका घेतला.त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव होतं विजय साळसकर. होय हेच ते विजय साळसकर ज्यांनी २६/११ च्या हल्ल्यात आपल्या प्राणाची आहुती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here