विशाळगड दगडफेक प्रकरणी संभाजीराजेंसह 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कोल्हापूरमधील विशाळगड (Vishalgad) परिसरात झालेल्या अतिक्रमणाविरोधात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje) यांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे. यामुळे त्यांच्यासह 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी काही अज्ञातांनी विशाळगड येथील अतिक्रमणांविरोधात परिसरात तोडफोड केली होती. यामुळे तणावपूर्व परिस्थिती निर्माण झाली. याप्रकरणीच पोलिसांनी 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर काहींना अटकही करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजीराजे यांनी पुढाकार घेत रविवारी ‘चलो विशाळगडचा नारा’ दिला होता. रविवारी त्यांच्यासह अनेक शिवभक्त विशाळगडावर गेले होते. याच दरम्यान काही अज्ञातांनी येऊन गावांमध्ये धुडगूस घातला. तसेच स्थानिकांवर हल्लाही केला. एवढेच करून न थांबता घरांची, वाहनांची तोडफोड केली. यात अज्ञातांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत अनेक गावकरी जखमी झाले. ज्यामुळे परिसरात चांगलाच गोंधळ उडाला.

या सर्व घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अनेकांना ताब्यात घेतले. तसेच, अनेकांविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर संभाजींनराजेंनी आज शाहूवाडी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांसोबत चर्चा केली. पुढे घडलेल्या प्रकारानंतर संभाजींनराजेंनी x वर पोस्ट करत म्हणले की, “काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे. काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा.”