चालत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची हत्या करणाऱ्या तरुणाची जेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी एका तरुणाने चालत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची हत्या केल्याचे समोर आले होते. आता याच प्रियकराने तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आरोपी प्रियकराला जीआरपीने भोपाळमध्ये अटक केली आहे. तेव्हापासून तो सीहोर जेलमध्ये होता. यानंतर आपल्या प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकराने स्वतःही आत्महत्या केली आहे. यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण
आरोपी सागर सोनी याने 1 जूनच्या रात्री इंदौर-बिलासपुर नर्मदा एक्सप्रेस ट्रेनमध्ये आपल्या 21 वर्षीय प्रेयसी मुस्कान हाडा हिची गळा चिरुन हत्या केली होती. हि हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. या हत्येनंतर संपूर्ण ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली होती. यानंतर ट्रेन सीहोर स्टेशनवर थांबवण्यात आली. यानंतर पोलिसांनी तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सीहोरमध्ये उतरवला. या प्रकरणाचा तपास पोलीस आणि जीआरपी दोघेही करत होते. यानंतर पोलिसांनी आरोपी सागर सोनी याला भोपाळमधून अटक केली आहे.

आरोपी सागर हा ट्रेनमध्ये वृत्तपत्र आणि चहा विकण्याचे काम करायचा. तसेच सागर आणि मुस्कान यांची मैत्रीही होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी सागरने सांगितले कि त्याचे मुस्कानवर प्रेम होतं. मात्र, मुस्कानने त्याच्या मोबाईल नंबर ब्लॉक केला होता.यामुळे त्याला मुस्कानसोबत बोलता येत नव्हते. यामुळे आरोपी सागरने 1 जून रोजी चालत्या ट्रेनमध्ये मुस्कानची हत्या केली होती. यानंतर सोमवारी सीहोर तुरुंगात बंद असलेल्या भोपाळचा निवासी सागर सोनी याने टी शर्टच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले पण त्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. आरोपी सागर सोनी याला दोन दिवस आधी कैद करण्यात आले होते. कोविड प्रोटोकॉलमुळे त्याला विभक्त ठेवण्यात आले होते. अशी माहिती जेल अधीक्षक संजय सेहलाम यांनी दिली आहे.

Leave a Comment