लाली अन पावडर लावून बसलेल्यांनी खिडकी बंद करावी; सामनातून भाजपवर बोचरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
टीम, HELLO महाराष्ट्र। विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी आक्रमक पवित्र घेत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील विरोधकांचा समाचार घेत टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. अधिवशेन सुरु झाल्यापासून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये हा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता सामना च्या अग्रलेखातून देखील भाजपवर जोरदार टीका करण्यात अली आहे. 
कांग्रेससोबत आघाडी करण्याचा बाळासाहेबांना शब्द दिला होता का? फडणवीसांनी विचारलेल्या या प्रश्नावर उत्तर देताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, तुम्हाला शब्द दिल्याचे कौतुक कधीपासून, तसेच भारतीय जनता पक्षाची पालखी कायम वाहणार नाही, असा शब्द मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता. आता याच उत्तरावरून सामनाच्या माध्यमातून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

Leave a Comment