कृष्णेच्या पात्रात आढळली १२ फूट अजस्त्र मगर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्रथमेश गोंधळे । सांगली प्रतिनिधी

 कृष्णेच्या काठावर मोठ्या प्रमाणावर मगरींची दहशत पसरली असतानाच काल सायंकाळी मिरजेतील; कृष्णा घाट परिसरात एक अजस्त्र मगर मृत अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. तब्बल १२ फुटी मगर दूषित पाण्याने मृत झालेले मासे खाल्ल्याने मृत झाल्याचं बोललं जात आहे.शुक्रवारी दुपारी हरिपूर येथे दोन अजस्त्र मगरीचे दर्शन झाले होते. त्यामुळे कृष्णेचा काठ मगरीच्या पुन्हा दहशती खाली आला होता. त्यातच काल हरीपूरच्या पुढेच असणाऱ्या मिरजेच्या कृष्णा घाट येथे तब्बल १२ फुटी अजस्त्र मगर मृत अवस्थेत आढळली.

नदी काठी असणाऱ्या बोन्द्रे यांच्या शेतामध्ये हि मगर निदर्शनास आली. याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी वनविभागाला दिल्यानंतर वनविभाग तसेच प्राणीमित्र तातडीने दाखल झाले. त्यांनी मगरीचा मृतदेह ताब्यात घेत घटनेचा पंचनामा केला. यावेळी मगरीच्या अंगावर घातपात किंवा जखमांसारख्या कोणत्याच खुणा नव्हत्या. मात्र मगरीच्या जबड्यामध्ये मृत मासे आढळून आले. त्यामुळे नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्याने मृत झालेले मासे खाल्ल्याने मगरीच्या मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाणी आणि वनविभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित विभागाने पंचनामा करून नदीकाठीच त्या मृत मगरींवर अंत्यसंस्कार केले. दरम्यान नदी मध्ये मोठ्या प्रमाणावर सोडलेल्या रसायनमिश्रित पाण्यामुळे नदीत मोठ्या संख्येने मासे मृत्युमुखी पडले आहेत. यापुर्वीही पलूस येथे मगर म्रुतावस्थेत सापडली असून वारंवा मगरींचा म्रुत्यू संशयास्पद आहे. मासेमारी करणारे मगरींवर विषप्रयोग करीत असल्याने याबाबत चाैकशी करण्यांची मागणी यावेळी प्राणिमित्रांनी वनविभागाकडे केली आहे.

Leave a Comment