कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी
विजय दिवस समारोहाचा आकर्षण असलेल्या शस्त्रास्त्र प्रदर्शनास येथील लिबर्टी मजदूर मंडळाच्या मैदानावर प्रारंभ झाला. या प्रदर्शनात सैन्यदलाची जवळुन लांब मारा करणारी, जमिनीवरुन आकाशात मारा करणारी शस्त्रे, विविध बंदुका, रडार व अन्य शस्त्रे येथील लिबर्टी मजदुर मंडळाच्या मैदानावर शस्त्रास्त्र प्रदर्शनात सहभागी झाली आहेत. ती पाहण्यासाठी अबालवृध्दांची गर्दी होत आहे.
कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या शस्त्रास्त्र प्रदर्शाचे उदघाटन तहसिलदार विजय पवार, माजी नगरसेवक सौरभ पाटील, विजय वाटेगावकर, उद्योजक जयदीप अरबुणे, उद्योजक संदीप कोटणीस यांच्या उपस्थितीत झाले. यानिमित्ताने भारतीय सैन्यदलाच्या शस्त्र सज्जता पहायला मिळत आहे. विजय दिवस समितीची शहिदोंकी गॅलरी आहे. त्यात शहीद जवानांची माहिती देण्यात आली आहे. प्रदर्शनात शस्त्रास्त्र पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.
यावेळी विजय दिवस समितीचे विनायक विभुते, चंद्रकांत जाधव, सहसचीव विलासराव जाधव, अॅड. परवेझ सुतार, उद्योजक सलीम मुजावर, महालिंग मुंढेकर, सतीश बेडके, रत्नाकर शानभाग, प्रा. बी. एस. खोत, रमेश जाधव, मिनल ढापरे, भरत कदम, राजु अपिने, पौर्णिमा जाधव, आसमा इनामदार, प्राजक्ता पालकर, मंगेश कुलकर्णी, मिल्ट्री होस्टेलचे अधिक्षक राजाराम सावंत, सहाय्यक अधिक्षक धनाजी जाधव, आनंदराव लादे आदींसह मान्यवर उपस्थित होते.