CRPF च्या जवानांची तुकडी पुण्यात दाखल; ‘या’ भागात काढला रुटमार्च

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | पुणे मनपा क्षेत्रातील एकुण कोरोना बाधितांची संख्या आता ३ हजार पार गेली अाहे. शहरात सद्यपरिस्थितीत एकुण ६९ परिसर कटेंनमेंट झोन म्हणुन प्रशासनाने घोषित केले आहेत. या भागात नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव असतानाही अनेक नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. यामुळे आता रॅपिड अॅक्शन फोर्सच्या तुकडीला तैनात करण्यात आले असून आज त्यांनी शहरातील सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर परिसरातून रुटमार्च काढला.

शहरात ज्या भागात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे अशा कटेंनमेंट झोन मध्ये नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणुन आज रुट मार्च काढण्यात आला. शहर पोलिसांच्या मदतीला आता सीआरपीएफचे जवान आल्याने नागरिकांना शिस्त पाळावी लागणार आहे.

दरम्यान, बुधवारी तारिख १३ मे रोजी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय पोलिस दलाची १२० जवानांची एक तुकडी पुणे शहरात दाखल होणार असल्याची माहिती दिली होती. रमजान सणाच्या पार्श्वभुमीवर शहर पोलिसांच्या मदतीला सीआरपीएफची तुकडी आलेली असल्याने आता शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्रशासनाला मदत होणार आहे.

Pune

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment