Cryptocurrency Price : Bitcoin मध्ये घसरण तर Solana,Avalanche मध्ये लक्षणीय वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी बाजार आज, गुरुवारी पुन्हा ग्रीन मार्कवर आहे. सकाळी 9:43 पर्यंत, ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅपने 0.73% च्या उडीसह $2.15ट्रिलियनचा आकडा गाठला आहे. मोठ्या कॉईन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Solana आणि Avalanche मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

Coinmarketcap च्या डेटानुसार, मंगळवारी बातमी लिहिण्याच्या वेळी, Bitcoin 0.58% खाली येऊन $47,121.85 वर ट्रेड करत होता, तर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे कॉईन असलेल्या Ethereum ची किंमत किंचित वाढली आहे. गेल्या 24 तासात ते 0.44% वाढून $3,402.02 वर पोहोचले. आज, बिटकॉइनच्या किंमतीत घट झाल्यामुळे, त्याचे बाजारातील वर्चस्व 41.6% पर्यंत खाली आले आहे, तर Ethereum चे बाजारातील वर्चस्व 19% आहे.

कोणत्या कॉइनमध्ये काय चाललंय?
-Solana – SOL – प्राइस: $121.29, वाढ : 9.12%
-Avalanche – प्राइस: $98.73, वाढ : 6.74%
-BNB – प्राइस: $444.98, वाढ : 2.65%
-Shiba Inu – प्राइस: $0.0000278, वाढ : 2.12%
-Dogecoin – DOGE – प्राइस: $0.1449, वाढ : 1.80%
-Polkadot – प्राइस:$22.67, वाढ : 1.80%
-Cardano – ADA – प्राइस: $1.20, वाढ : 1.07%
-XRP – प्राइस: $0.8633, वाढ : 0.24%
-Terra – LUNA – प्राइस: $107.16, वाढ : 0.87%

सर्वाधिक वाढ झालेले कॉईन्स
Dotmoovs (MOOV), Mooney आणि Zilliqa (ZIL) हे गेल्या 24 तासांत सर्वाधिक वाढ झालेले कॉईन्स आहेत. Dotmoovs (MOOV) मध्ये 256.71% वाढ झाली आहे, तर Mooney नावाचे कॉईन 90.54% ने वाढले आहे. याशिवाय Zilliqa (ZIL) मध्ये 69.38% ची वाढ झाली आहे.

Leave a Comment