Cryptocurrency Price : मोठ्या घसरणीनंतर आज तेजी, Shiba Inu झाली सर्वात मोठी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली घसरण बुधवारी संपली. आज सकाळी 9:59 पर्यंत, ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅप 1.65% ने वाढून $1.87 ट्रिलियन झाले आहे. मोठ्या कॉईन्सबद्दल बोलायचे तर, टॉप 10 मध्ये समाविष्ट असलेले बहुतेक कॉईन्स प्लसमध्ये दिसले आहेत. सर्वात मोठी वाढ Shiba Inu मध्ये आली आहे.

Coinmarketcap च्या डेटानुसार, बातमी लिहिण्याच्या वेळी, Bitcoin 0.45% वाढून $40,014.96 वर ट्रेड करत होते, तर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी करन्सी, Ethereum ची किंमत गेल्या 24 तासात 1.83% वाढून $3,045.46 वर पोहोचली होती. आज Bitcoin चे मार्केट वर्चस्व 40.8% पर्यंत घसरले आहे, तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 19.6% आहे.

Shiba Inu मध्ये मोठी तेजी
Shiba Inu मध्ये बुधवारी 18 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे. काल त्याच वेळेबद्दल बोलायचे झाल्यास, Shiba Inu मध्ये एका आठवड्यात 16 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली होती, मात्रआज ती आठवडाभरातील घसरण सावरली आहे. आता गेल्या 7 दिवसांपासून तो कॉईन प्लसमध्ये आहे. बातमी लिहिताना Shiba Inu ची किंमत $0.00002655 होती.

कोणत्या कॉईनमध्ये काय चाललंय?
-Shiba Inu – किंमत: $0.00002655, वाढ : +18.53%
-BNB – किंमत: $417.44, वाढ : +4.23%
-Dogecoin – DOGE – किंमत: $0.1403, वाढ : +2.70%
-Solana – SOL – किंमत: $103.31, वाढ : +2.73%
– Terra – LUNA – किंमत: $84.97, वाढ : +2.34%
– Avalanche- किंमत: $76.95, वाढ : +1.49%
-Cardano – ADA – किंमत: $0.9531, वाढ : +2.19%
-XRP – किंमत: $0.7167, वाढ : +2.12%

सर्वाधिक वाढ झालेलं कॉईन्स
Coinmarketcap नुसार, MetaDogecolony (DOGECO), onLEXpa आणि Church Dao (CHURCH) हे गेल्या 24 तासांतील सर्वाधिक वाढ झालेलं कॉईन्स तीन सर्वात प्रमुख कॉईन्स आहेत. MetaDogecolony (DOGECO) ने 24 तासांत 605.84 टक्क्यांची जबरदस्त उडी घेतली आहे. OnLEXpa 585.65 टक्क्यांनी वाढला आहे, तरChurch Dao (CHURCH) 263.24 टक्क्यांनी वाढला आहे.

Leave a Comment