नवी दिल्ली । सोमवार, 14 मार्च रोजी, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये घसरण झाली. सकाळी 9.40 पर्यंत ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅप 2.50% घसरून $1.71 ट्रिलियनवर आली. Bitcoin, Ethereum, Shiba Inu आणि Cardano मध्ये घसरण झाली आहे. प्रमुख टोकन्सपैकी, टेरा लुना ग्रीन मार्कवर ट्रेड करताना दिसले.
Coinmarketcap कडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी ही बातमी लिहिण्याच्या वेळी, बिटकॉइन 2.61% घसरून $38,173.29 वर ट्रेड करत होता तर Ethereum ची किंमत गेल्या 24 तासात 2.08% घसरून $2,539.10 वर आला होता. यावेळी, Bitcoin चे मार्केट वर्चस्व 42.5% तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 17.8% होते.
कोणत्या कॉईन्समध्ये किती घसरण झाली ?
-BNB – किंमत: $365.95, घसरण : 2.80%
-Shiba Inu – किंमत: $0.00002176, घसरण : 2.66%
-Solana – SOL – किंमत: $79.89, घसरण : 3.58%
-Cardano – ADA – किंमत: $0.7927, घसरण : 0.58%
-Dogecoin (DOGE) – किंमत: $0.1118, घसरण : 3.68%
-XRP – किंमत: $0.7644, घसरण : 3.95%
– Avalanche- किंमत: $68.43, घसरण : 4.18%
-Terra – LUNA – किंमत: $90.30, वाढ : 2.60%
सर्वाधिक वाढ झालेले कॉईन्स
Mercenary (MGOLD), Terbo Game Coin (TGC) आणि Marvelous NFTs (Bad Days) हे टॉप जंपर्समध्ये होते. Mercenary (MGOLD) ने गेल्या 24 तासात 980.20% ची वाढ नोंदवली आहे, मात्र बातमी लिहायच्या आधी या कॉईन्सने हजार टक्क्यांहून जास्तीची उडी घेतली होती. याशिवाय Terbo Game Coin (TGC) ने 532.17% ची उडी घेतली आहे तर Marvelous NFTs (Bad Days) ने 317.08% ची उडी घेतली आहे.