नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये आज बुधवारी फारशी हालचाल नाही. क्रिप्टो मार्केट कॅप किरकोळ पॉईंट्ससह ग्रीन मार्कवर होते. सकाळी 9:48 पर्यंत, जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप 0.07% ने वाढून $2.15 ट्रिलियन पर्यंत पोहोचली आहे. मोठ्या नाण्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Terra – LUNAने कालच्या प्रमाणे चांगली वाढ दर्शविली, तर Bitcoin आणि Ethereum मध्ये खूपच कमी हालचाल दिसून आली.
Coinmarketcap च्या डेटानुसार, मंगळवारी बातमी लिहिण्याच्या वेळी, Bitcoin $47,409.07 वर ट्रेड करत होता, 0.13% वर. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे कॉइन असलेल्या Ethereum ची किंमत गेल्या 24 तासात 0.27% वाढून $3,385.32 वर पोहोचली. आज Bitcoin चे मार्केट वर्चस्व 42.2% आहे, तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 19% आहे.
कोणत्या कॉईनमध्ये किती वाढ झाली ?
-Terra – LUNA – प्राइस: $106.32, वाढ : 2.42%
-Dogecoin – DOGE – प्राइस: $0.1422, वाढ : 1.55%
-Solana – SOL – प्राइस: $111.06, वाढ : 1.33%
-Shiba Inu – प्राइस: $0.00002718, वाढ : 0.66%
-BNB – प्राइस: $433.19, वाढ : 0.04%
-Polkadot – प्राइस: $22.27, वाढ : 0.04%
-Avalanche – प्राइस: $92.37, घसरण : 1.88%
-XRP – प्राइस: $0.8612, घसरण : 1.17%
-Cardano – ADA – प्राइस: $1.19, घसरण : 0.95%
सर्वाधिक वाढ झालेले कॉईन्स
सकाळी 9:30 (गेल्या 24 तासात) Will Smith Inu (WSI), Pyroblock (PYR), आणि MetaPay हे तीन सर्वात जास्त वाढ झालेले कॉईन्स होते. बुधवारी बातमी लिहिल्यापर्यंत Will Smith Inu (WSI) नावाच्या कॉईनने 2647.87% ची उडी घेतली आहे, तर Pyroblock (PYR) ने 1789.40% ची उडी घेतली आहे. MetaPay तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यामध्ये 1004.28% वाढ झाली आहे.