नवी दिल्ली । गेल्या 24 तासांत क्रिप्टोकरन्सी मार्केट 3.19% वाढले आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10:47 वाजता जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप $2.07 ट्रिलियन पर्यंत वाढले. बिटकॉइन आणि इथेरियम हे दोन्ही मोथे कॉईन्स नफ्यासह ट्रेड करत आहेत. इथेरियम मध्ये 3 टक्क्यांहून जास्त आणि बिटकॉइनमध्ये 2 टक्क्यांहून जास्त वाढ दिसून आली आहे. गुरुवारी, टेरा लुना, डॉजकॉइन आणि शिबा इनूमध्ये लक्षणीय वाढ होती.
गुरुवारी, बिटकॉइन 2.21% च्या वाढीसह $43,635 वर ट्रेड करत होता. बिटकॉइनने गेल्या 24 तासांत $42,541.92 चा नीचांक गाठला आणि नंतर $44,135.37 चा उच्चांक गाठला. इथेरियम 3.23% वाढून $3,335 वर ट्रेड करत आहेत. याच कालावधीत इथेरियमने $3,216.72 चा नीचांक आणि $3,401.22 चा उच्चांक गाठला. गुरुवारी बातमी लिहिली जाईपर्यंत क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉइनचे वर्चस्व 39.9 टक्के होते, तर इथेरियमचे वर्चस्व विक्रमी 19.2 टक्के होते.
‘या’ करन्सीमध्ये झाली 10% पेक्षा जास्त वाढ
Coinmarketcap च्या डेटानुसार, शिबा इनू 15 टक्क्यांहून जास्त, डोगेकॉइन 12 टक्क्यांहून जातीस आणि टेरा लुना 10 टक्क्यांहून जास्तीचे ट्रेड करताना दिसले. मार्केट कॅपनुसार, शिबा इनू करन्सी 13 व्या क्रमांकावर आहे, गेल्या 24 तासांमध्ये 15.38% च्या उडीसह $0.000032 वर ट्रेड करत आहे.
Dogecoin मार्केट कॅपच्या बाबतीत 12 व्या क्रमांकावर आहे आणि 11.80 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. ही करन्सी $0.171449 वर ट्रेड करत होती. टेरा लुना गेल्या 24 तासांमध्ये 10.51% च्या वाढीसह $80.87 वर ट्रेड करत आहे. मार्केट कॅपनुसार ती आज 9 व्या क्रमांकावर आहे.
एका दिवसात सर्वाधिक वाढणाऱ्या करन्सी
गेल्या 24 तासांत तीन करन्सीमध्ये PAPPAY मध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. या करन्सीने 900.04% झेप घेतली आहे. BrowniesSwap (BROWN) दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यात 520.75% ची वाढ झाली आहे आणि DECENT डेटाबेस तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यामध्ये 480.74% ची वाढ झाली आहे.