हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खाजगी क्षेत्रातील सर्वात जुनी बँक असलेल्या केरळमधील CSB Bank कडून आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात बदल केले आहेत. हे जाणून घ्या कि,1920 मध्ये या बँकेची स्थापना कॅथोलिक सीरियन बँक लिमिटेड म्हणून करण्यात आली होती. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहिती नुसार, आता बँकेकडून आपल्या बचत खात्यांवर जास्तीत जास्त 5.50 टक्के व्याज मिळेल. 1 सप्टेंबर 2022 पासून हे नवीन दर लागू होणार आहेत.
CSB Bank च्या बचत खात्यावरील व्याज दर
आता CSB Bank कडून ग्राहकांना बचत खात्यातील 1 लाख रुपयांपर्यंतच्या शिल्लक रकमेवर 2.10 टक्के व्याजदर मिळेल. सध्या, बँकेकडून 1 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी 2.10 टक्के आणि 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 25 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी 2.75 टक्के व्याज दर देत आहे. तसेच बँक सध्या 25 लाख रुपये आणि 50 लाखांपर्यंतच्या रकमेसाठी 3.50 टक्के व्याज दर देत आहे.
CSB Bank कडून आता 50 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 1 कोटी रुपयांपर्यंतच्या शिल्लक रकमेवर 4.00 टक्के व्याजदर देत आहे. त्याचबरोबर आता बँक 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 2 कोटी रुपयांपर्यंतच्या शिल्लक रकमेवर 4.25 टक्के व्याज देईल. तसेच आता 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 5 कोटी रुपयांपर्यंतच्या शिल्लक रकमेसाठी 4.50 टक्के तर 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 25 कोटी रुपयांपर्यंतच्या शिल्लक रकमेसाठी 5.00 टक्के व्याज दर मिळेल.
CSB Bank आता चालू आर्थिक वर्षात क्रेडिट कार्ड व्यवसायात उतरणार
या चालू आर्थिक वर्षात CSB Bank कडून क्रेडिट कार्ड व्यवसायात उतरण्याचे प्लॅनिंग केले जात आहे. अलीकडेच, बँकेचे एमडी आणि सीईओ (अंतरिम) पी मंडल म्हणाले होते की,”बँक हळूहळू आणखी प्रॉडक्ट्स लाँच करेल. तसेच कोणतीही चूक होऊ नये यासाठी बँक यामध्ये उतरण्यापूर्वी सर्व तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले.”
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.csb.co.in/
हे पण वाचा :
Bank FD : ‘या’ बँकेच्या ग्राहकांना FD वर मिळणार 1 टक्का जास्त व्याज, नवीन दर तपासा !!!
Wipro : ‘या’ IT कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिले करोडो रुपये !!!
आता SBI मध्ये कुठेही अन् कधीही उघडता येणार खाते !!! कसे ते जाणून घ्या
Kotak Mahindra Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा