पुढल्या वर्षी धोनी चेन्नई कडून खेळणार का ?? चेन्नईच्या CEO चे मोठे विधान ..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 मधून 3 वेळचे चॅम्पियन असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स ला गाशा गुंडाळावा लागला आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नई स्पर्धेबाहेर गेली. अनुभवी खेळाडूंचा हरवलेला फॉर्म, सुरेश रैनाची अनुपस्थिती, ढेपाळलेली फलंदाजी, आणि सुमार गोलंदाजी यामुळे चेन्नईला सुरुवातीपासूनच लय सापडली नाही.चेन्नईच्या पराभवाची कारणे अनेक असली तरी काही लोकांनी यासाठी धोनीला सुद्धा जबाबदार धरले आहे.

धोनीच्या संघाचा आतापर्यंत IPLमधील सर्वात संतुलित संघ असा लौकिक होता. पण यंदा त्यांना लौकिकाला साजेसा खेळ करणं शक्य झालं नाही. मधल्या काळात धोनीच्या खराब फॉर्ममुळे तो कदाचित स्वत:ला संघाबाहेर ठेवून नव्या दमाच्या खेळाडूला संघाची धूरा देणार की काय असा अंदाज बांधला जात होता. पण, कर्णधाराने कधीही पळ काढायचा नसतो असं सांगत धोनीने त्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. अशा परिस्थितीत CSKचे CEO कासी विश्वनाथन यांनी धोनीबद्दल महत्त्वाची अपडेट दिली.

IPLमध्ये धोनीने संघासाठी ३ विजेतेपजदं मिळवून दिली आहेत. बाद फेरीसाठी पात्र न ठरण्याची ही आमच्या संघाची पहिलीच वेळ आहे. आमच्या संघाएवढं सातत्य आजपर्यंत इतर कोणत्याही संघाने दाखवलेलं नाही. एका खराब वर्षामुळे आम्ही सरसकट बदल करायला हवा असं अजिबात नाही. पुढच्या वर्षीच्या IPL स्पर्धेत धोनी नक्की खेळेल आणि मला खात्री आहे की तो संघाचं नेतृत्व करत असेल. IPL 2021मध्ये CSKचा कर्णधार धोनीच असेल”, असे विश्वनाथन टीओआयशी बोलताना म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment