हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग (CT-2 EV) खूप पुढे गेलं असून आपल्या डोक्यातही येणार नाहीत अशा अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत. दमदार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक नवनवीन गोष्टी निर्माण होत आहेत. पण फोल्ड होणार कार तयार होईल असा विचार तुम्ही कधी केलाय का? परंतु इस्रायल इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप सिटी ट्रान्सफॉर्मर चक्क फोल्ड होणारी इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही ती फोल्ड करून कुठेही नेऊ शकता आणि तिचे वजन फक्त 450 किलो आहे.
1 मीटर जागेत होईल पार्क –
CT-2 असे या इलेक्ट्रिक कारचे नाव आहे. (CT-2 EV) सुरुवातीला ही कार युरोपियन मार्केटमध्ये लॉन्च केली जाईल. प्रचंड गर्दी आणि ट्राफिक असलेल्या ठिकाणी ही मिनी कार दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल. या गाडीची लांबी 2,500 मिमी, रुंदी 1,400 मिमी (परफॉर्मन्स मोड) आणि उंची 1,580 मिमी आहे. या इलेक्ट्रिक कारला 1,800 मिमीचा व्हीलबेस मिळतो. CT-2 इलेक्ट्रिक कार फक्त 1 मीटर जागेत सुद्धा सहज पार्क करता येते.
180 किलोमीटरपर्यंत रेंज-
या कारमध्ये 7.5 किलोवॅट क्षमतेच्या (CT-2 EV) दोन इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आल्या आहेत. एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर ही फोल्डिंग वाली इलेक्ट्रिक कार 180 किलोमीटरपर्यंत रेंज देण्यास सक्षम आहे. कारचे टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रतितास आहे. अवघ्या 5 सेकंदात ही कार ताशी 0 ते 50 किलोमीटरचा वेग पकडते.
किंमत किती- (CT-2 EV)
गाडीच्या किमतींबाबत सांगायचं झाल्यास, CT-2 ची किंमत सुमारे $16,000 (सुमारे 13 लाख रुपयांपासून) असू शकते.