गुवाहाटीत अनिश्चित काळासाठी कर्फ्यू जाहीर; कॅब विरोधात संपूर्ण आसाममध्ये आंदोलन तीव्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । आसाम राज्यात नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (कॅब) तेथील जनता तीव्र विरोध दर्शवत रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळं कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने गुवाहाटीत आज संध्याकाळी ६.१५ मि.पासून अनिश्चित काळासाठी कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. याबाबत गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. जोपर्यंत संपूर्ण परिस्थिती पूर्वीसारखी शांत होत नाही तोपर्यंत कर्फ्यू लागू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

गुवाहाटीप्रमाणेच आसामच्या इतर शहरात सुद्धा कॅब विरोधात आंदोलन तीव्र झालं असून. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आसामची राजधानी दिसपूरमध्ये जनता भवन जवळ आंदोलनकर्त्यांनी बस जाळली तर इतर शहरात पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात रस्त्यावर संघर्ष पाहायला मिळाला. हाती आलेल्या वृत्तानुसार येत्या २४ तासाकरिता काही जिल्ह्यात मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यात आसामधील लखीमपूर, तिनसुकिया, धिमाजी, दिब्रुगढ, शिवसागर, जोरहाट, कामरूप, चराईदेव जिल्ह्यांचा समावेश आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयक काल लोकसभेत पारित झालं असून आज राज्यसभेत ते पारित होण्यासाठी मंडळ गेलं आहे. या विधयेकात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून धार्मिक छळाला कंटाळून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद या नागरिकत्व सुधारणा विधेयक करण्यात आली आहे. दरम्यान धर्माच्या आधारावर विचार न करता सर्व बेकायदा स्थलांतरितांना हद्दपार करण्यासाठी २४ मार्च १९७१ ही आधार तारीख निश्चित करणारी आसाम करारातील तरतूद यामुळे निष्प्रभ ठरेल, असे सांगून ईशान्य भारतातील अनेक संस्था आणि संघटनांनी या विधेयकाला मोठा विरोध पाहायला मिळत आहे. चे म्हणणं आहे.

 

 

 

Leave a Comment