जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : मकरसंक्रांती सणामुळे माण तालुक्यातील धार्मिक स्थळांवर संचारबंदी लागू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाला लक्षात घेता मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासनाने नविन आदेश दिले आहेत. मकरसंक्रांती निमित्त माण तालुक्यात सुमारे 1 ते दीड लाख महिला या माण तालुक्यातील विविध धार्मिक ठिकाणी देवदर्शनासाठी येत असतात. त्यामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून माण तालुक्यातील स्थानिक प्रशासनाला आस्थापना व जमावबंदीचे आदेश दहिवडीचे तहसिलदार यांनी जारी केले आहेत.

माण तालुक्यातील कुळकजाई येथील सीतामाई मंदिर, शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव मंदिर आणि गोंदवले येथील ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर या महत्वाच्या आणि प्रसिद्द असणाऱ्या देवस्थानला भेट देण्यासाठी आणि दर्शनासाठी मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त मोठी गर्दी होत असते. कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव लक्षात घेता, गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने नविन आदेश दिले आहेत.

सातारा जिल्हाधिकारी यांनी स्थानिक तालुका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना या महत्वाच्या ठिकाणी जमावबंदी आणि आस्थापना लागू करण्याचे आदेश दिले आहेत. सदर देवस्थानच्या 500 मीटर अंतरापर्यंत हे आस्थापनेचे आणि जमावबंदीचे नियम बंधनकारक राहतील, असा आदेश दहिवडी तहसिलदार यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे आदेश पालन करणे सर्वांना बंधनकारक राहील, तसेच नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा देखील इशारा दिला आहे.

Leave a Comment