Curry Leaves | कढीपत्ता हा आपल्या भारतीय जेवणातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. कढीपत्त्याचा वापर जवळपास सगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खास करून साउथ इंडियन पदार्थांमध्ये कढीपत्त्याचा वापर जास्त होतो. कढीपत्त्यामुळे पदार्थाला चव देखील चांगली येते. आणि वेगळा सुगंध येतो. परंतु या कढीपत्त्यामुळे आपल्या आरोग्याला देखील अनेक फायदे होतात. कडीपत्त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असता. आयुर्वेदात देखील कढीपत्त्याला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात कढीपत्त्याचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही तर रोज सकाळी रिकाम्या पोटी पाच ते सात कडीपत्त्याच्या पानांचे सेवन केले तर तुमच्या शरीराला खूप चांगले फायदे मिळतील.
कढीपत्त्यामध्ये (Curry Leaves) आयन, प्रोटीन, कॅल्शियम, विटामिन सी, अँटीऑक्सिडंट असे अनेक गुणधर्म असतात. ज्यामुळे आपल्या शरीराच्या अनेक समस्या दूर होतात. कढीपत्त्याची पाने आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तुम्ही कढीपत्त्याची पाने दररोज खाऊन त्यावर कोमट पाणी पिऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला जास्तीचा फायदा होईल. आता कढीपत्त्याची पाने दररोज खाल्ल्याने तुमच्या शरीराला कोणते फायदे होतात हे आपण जाणून घेणार आहोत.
पचनक्रिया सुधारते | Curry Leaves
तुम्ही जर रोज सकाळी रिकामे पोटी कढीपत्त्याची काही पाने खाल्ली आणि कोमट पाणी पिले तर पोटा संबंधित तुमचे जे काही आजार आहे. ते सगळे दूर होतात. कढीपत्त्यामध्ये फायबर, जास्त प्रमाणात असते त्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली सुरळीत चालते तुमचे. तसेच अन्नदे खील सहजपणे पचते. नियमित या पानांचे तुम्ही सेवन केले, तर गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कायमच्या दूर होतील.
ब्लड शुगर कंट्रोल मध्ये राहते
कढीपत्त्याच्या पानांचा तुमच्या शरीराला देखील खूप फायदा होतो. तुम्ही जर रोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन केले, तर डायबिटीसच्या रुग्णांना फायदा होतो. यामुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोल मध्ये राहते. आणि शरीरात इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढण्यास मदत होते. तुम्ही जर कढीपत्त्याच्या पानांचे दररोज सेवन केले, तर टाईप 2 डायबिटीसचा धोका देखील कमी होतो.
वजन कमी होते
तुम्ही जर एक महिना उपाशी पोटी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन केले, तर तुमचे वजन देखील कमी होण्यास मदत होते. यामुळे मेटाबोलिझम बुस्ट होते. आणि शरीरातील एक्सट्रा कॅलरी बर्न होतात. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी देखील कढीपत्त्याच्या पानांच्या सेवन होते. यामुळे तुमची भूक देखील कंट्रोलमध्ये राहते.
इम्युनिटी बूस्ट होते
तुम्ही जर रोज सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्त्याची पाने खाल्ली, तर तुमची इम्युनिटी वाढेल यामध्ये. यामध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असतात. कढीपत्त्याच्या पानांमुळे अनेक आजारांपासून आणि इन्फेक्शन पासून तुमच्या शरीराचे संरक्षण होते.
डोळ्याची दृष्टी वाढते | Curry Leaves
डोळ्याच्या दृष्टी वाढण्यासाठी कढीपत्ताच्या पानांचा खूप चांगला वापर होतो. कढीपत्त्याच्या पानांमध्ये विटामिन ए असते. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत होते. तसेच वाढत्या वयासोबत तर डोळ्या संबंधित काही आजार असतील तर ते देखील दूर होतात.
कढीपत्त्याची पाने कशी खावी ?
तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी पाच ते सात कडीपत्त्याची पाने चावून खा. त्यानंतर तुम्ही एक ग्लास कोमट पाणी पिऊ शकता. तुम्ही जर नियमितपणे एक महिना या पानांचे सेवन केले, तर काही दिवसातच तुमच्या शरीरात अद्भुत बदल होतील.