Curry Leaves Farming | आजकाल अनेक तरुण हे नोकरी सोडून व्यवसायाकडे वळत आहे. त्यातही अनेक लोक शेती हा व्यवसाय आहे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहे. आणि त्यातून चांगले उत्पन्न देखील घेत आहेत. शेती हा एक असा व्यवसाय आहे. तो कधीही बंद पडू शकत नाही. कारण शेतीमध्ये जर धान्य पिकवले गेले, तरच सगळेजण खाऊ शकतात. त्यामुळे शेतीत केलेली मेहनती नेहमीच कामाला येते. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो, बटाटा मिरचा, कढीपत्ता यांसारखे पदार्थ लागतच असतात. प्रत्येक पदार्थ करताना यातील कोणता ना कोणता पदार्थ लागत असतो. त्यामुळे बाजारात या भाज्यांना जास्त प्रमाणात मागणी असते. तुम्ही जर या भाज्या घरच्या घरी घरीच केल्या तर चांगला नफा कमवू शकता. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची कहाणी जाणून घेणार आहोत. त्यांनी कढीपत्त्याची (Curry Leaves Farming) शेती करून लाख रुपये कमावलेले आहे.
सोलापूर शहरांमध्ये डोनगाव हे आहे. तिथे शेतकरी आनंद शेटे यांनी आपल्या शेतीमध्ये एक नवीन प्रयोग केला आहे.त्यांनी कढीपत्त्याची लागवड केलेली आहे. त्यांनी तब्बल तीन एकर शेतीमध्ये कढीपत्त्याची लागवड केलेली आहे आणि ते वर्षाला त्यातून लाखो रुपयांची कमाई करत आहे. आनंद शेटे हे गेल्या दहा वर्षापासून शेती करत आहेत. परंतु त्यांना कडीपत्त्याची एक नवीन कल्पना सुचली. आणि त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये कढीपत्त्याची लागवड केली. वर्षातून जवळपास तीन वेळा ते कढीपत्त्याची छाटणी करतात आणि विक्री करतात.
कढीपत्त्याची (Curry Leaves Farming) मशागत जास्त असल्याने शेतकरी त्यातून त्याची जास्त लागवड करत नाही. परंतु तुम्ही जर कढीपत्त्याची शेती योग्य प्रकारात केली, तर त्यातून तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळेल. याबद्दल देखील आनंद शेटे यांनी सांगितलेले आहे. आनंद शेटे हे तीन एकर बागायती कडीपत्त्याची लागवड केलेली आहे. ते दर चार महिन्यांनी कढीपत्त्याची छाटणी करतात. आणि त्यांना वेगवेगळा दर मिळतो. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार कडीपत्त्याला कधी 50 रुपये 40 रुपये 35 रुपये पाच किलो असा दर मिळतो. त्यामुळे वर्षातून ते तीन ते चार लाख रुपये सहज यातून उत्पन्न कमावतात.
परंतु कढीपत्त्याची लागवड करण्याआधी जमिनीत खत टाकून खूप मशागत करावी लागते. ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करावी लागते. तसेच दर आठ दिवसातून एकदा त्यावर फवारणी करावी लागते. कीटकनाशक, तणनाशक फवारणी करावी लागते. त्यानंतर वर्षभर त्याची वाट पहावी लागते. परंतु एकदा कडीपत्त्याचे उत्पन्न चालू झाले की, त्यातून खूप चांगली कमाई करता येते. असे देखील त्यांनी सांगितले आहे.