‘या’ दोन सरकारी बँकांच्या ग्राहकांनी नोंद घ्यावी, आता हा कोड आणि User ID देखील बदलला; त्वरीत बँकेत साधा संपर्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर आपले खाते ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UNI) मध्ये असेल तर आपल्यासाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. वास्तविक, या दोन्ही बँका पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये विलीन झाल्या आहेत. यानंतर OBC आणि UNI बँकेचा आयएफएससी कोड (IFSC CODE) 1 एप्रिल 2021 पासून प्रभावीपणे बंद केला गेला आहे. युझर आयडी देखील बदलले आहेत. जुना युझर आयडी आणि आयएफएससी फक्त 31 मार्च 2021 पर्यंत वैध होते. आता या दोन्ही बँकांच्या ग्राहकांना नवीन आयएफएससी आणि युझर आयडी मिळतील. याबाबतची माहिती पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ट्विट केले आहे.

PNB ने काय म्हटले आहे?
PNB ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “प्रिय ग्राहक, eOBC आणि eUNI चे IFSC CODE 1 एप्रिल 2021 पासून बंद केले गेले आहे. नवीन आयएफएससीची माहिती संबंधित शाखांवर आणि पीएनबीच्या कॉर्पोरेट वेबसाइटवर उपलब्ध आहे. आपण येथून नवीन कोड मिळवू शकता.”

नवीन आयएफएससी कोड मिळविण्यासाठी काय करावे?
पीएनबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,”ग्राहक त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 9264092640 वर एसएमएस पाठवून नवीन आयएफएससी कोड मिळवू शकतात. यासाठी ग्राहक UPGR < Space > <अकाउंट नंबरचे शेवटचे 4 अंक> लिहून 9264092640 वर एसएमएस पाठवावेत.

नवीन User ID साठी काय करावे ?
आपला नवीन User ID जाणून घेण्यासाठी ग्राहकास Know your user ID वर लॉग इन करावे लागेल. eOBC ग्राहकांना त्यांच्या 8-अंकी User ID समोर O लावावा लागेल. eUNI ग्राहकांना त्यांच्या 8 अंकी User ID समोर U लावावा लागेल. 9-अंकी User ID असलेल्या ग्राहकांना बदल करण्याची आवश्यकता नाही.

आयएफएससीची गरज का आहे?
तुम्ही ऑनलाईन व्यवहार करता तेव्हा तुम्हाला बँक खाते क्रमांकासह बँकेचे आयएफएससी जोडावे लागेल. भारतातील बँकांची संख्या खूप मोठी आहे आणि अशा परिस्थितीत सर्व बँकांच्या शाखा लक्षात ठेवल्या जाऊ शकत नाहीत. त्यासाठी आयएफएससीची गरज भासते.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment