Monday, February 6, 2023

लग्नाचा वाढदिवस पडला महागात, नवऱ्याला खावी लागली जेलची हवा

- Advertisement -

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – लग्नाचा वाढदिवस म्हंटला कि पती आपल्या पत्नीसाठी काय करेल याचा काही नेम नाही. असाच लग्नाचा वाढदिवस एका पतीला चांगलाच महागात पडला आहे. हि घटना औरंगाबादमधील आहे. यामध्ये एका पतीने आपल्या पत्नीसोबत चक्क ‘मुळशी पॅटर्न’ स्टाईलने म्हणजेच तलवारीने केक कापत आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. हा व्हिडीओ त्याने सगळीकडे शेअर केला. त्यानंतर पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत त्या पतीला अटक करण्यात आली आहे.

काय आहे नेमका प्रकार
हा प्रकार औरंगाबाद शहरातील पुंडलीकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडला आहे. अटक केलेल्या तरुणाचे नाव दीपक सरकटे असे आहे. त्याने लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घरी केक मागवला होता त्यानंतर त्याने पत्नीच्या हातात तलवार देऊन दोघांनी मिळून तलवारीने तो केक कापला. याचा व्हिडिओ काढण्यात आला. तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाला. पोलिसांना हा व्हिडिओ मिळताच त्यांनी त्याची दखल घेतली.

- Advertisement -

त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. हा तरुण विश्रांतीनगरमध्ये राहतो. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता पलंगाखाली लपवून ठेवलेली तलवार सापडली. यानंतर पोलिसांनी तलवार जप्त करत त्या तरुणाला अटक केली आहे. विशेष म्हणजे हा तरुण कुठलाही गुन्हेगार नाही. तर नोकरी करणारा एक युवक आहे. त्याने फक्त नांदेडहुन तलवार आणून घरी ठेवली होती. पण आता तलवार बाळगणे त्याला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील घटनेचा अधिक तपास करत आहेत.