तुला कापू का? कोंबडी म्हणते नको नको.. पहा मजेशीर व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

गेल्या काही महिन्यापासून बर्ड फ्लूचे वारे जगभर पसरू लागले आहे. यातून मासांहार प्रेमीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याभरात बर्ड फ्लूने धुमाकूळ घातला असताना मजेशीर व्हिडोओ व्हायरल होत आहे. या कोंबडीच्या व्हिडीओत तुला कापू का? असं म्हणताच ही कोंबडी मात्र नको नको म्हणते आहे असे दृश्य दिसत आहे.

राज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अशा अनेक ठिकाणी कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. याचा संसर्ग वाढू नये त्यामुळे पोल्ट्री फार्मवरील कोंबडचा नष्ही करण्यात आल्या आहेत. या सगळ्यात मात्र हा कोंबडीचा विडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सांगली जिल्ह्यात पोल्ट्री फार्म व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. येथूनच डी आणि कोवळ्याची विक्री मोठया प्रमाणात होते. तसेच खवय्याची संख्या जास्त असल्याने मासांहारावर ताव मारला जातो. मात्र खवय्यानी भितीपोटी आस्वाद घ्यायचे कमी केले होते. याच्या मनातील भिती दूर करण्यासाठी महापालिकेने चिकण पार्टीचे आयोजनही केले होते. मात्र सोशल मिडीयावरील या व्हिडीओची चागलीच चर्चा रगली आहे.

एका चिकण दुकानात मालकाने सुरा हातात घेऊन ‘तुझे कापू क्या.’ अस म्हणताच कोंबडी जोरजोरात मुडी हलवत आहे. चंक्क कोबडीच मला कापू नका असे म्हणत मुडी हलवून सांगत आहे. दुकानमालक पुन्हा तुझे कापू क्या अस विचारतो आणि परत कोबडी तसच करते. शेवटी दुकानमालकाने ही कोंबडी कापली नाही. हा व्हिडीओ सध्या चागलाच व्हायरल झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment